सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व सैनिक नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त सहकार्याने उद्या १६ जुलैला शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शिव उद्यान जवळ मालवणी कवी दादा मडकईकर यांचा सत्कार होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या मालवणी कवीता एक लक्षवेधी ठरत आहेत. तसेच एक मालवणी भाषेला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी या कवितेच्या माध्यमातून करत आहेत. त्यामुळे त्यांचा गौरव सोहळा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने करण्याचे नियोजन होते. त्यानुसार १६ फेब्रुवारीला सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचा संगीत महोत्सव होत आहे. त्यावेळी श्री मडकईकर यांचा सत्कार होणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, सहसचिव राजू तावडे यांनी केले आहे.