Home स्टोरी कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने उद्या ९ ऑगस्ट रोजी ‘क्रांती दिना’ चे...

कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने उद्या ९ ऑगस्ट रोजी ‘क्रांती दिना’ चे आयोजन!

162

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तर्फे उद्या नऊ ऑगस्टला क्रांती दिन डेगवे येथील क्रांतिकारक श्री जयराम देसाई यांना मानवंदना अभिवादन कार्यक्रम सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. डेगवे येथे ज्या ठिकाणी देसाई यांना इंग्रजांनी फाशी दिली त्या ठिकाणी जाऊन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य मानवंदना देणार आहेत.  यावेळी बांदा येथील स्वातंत्र्य सैनिक श्री. एस. आर. सावंत, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग व गोगटे महाविद्यालय पानवळचे प्राचार्य व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. १८५७ पूर्वी देसाई यांनी डेगवे येथे इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून क्रांतीची सुरुवात केली होती.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व गोगटे महाविद्यालय पानवळ यांच्या संयुक्त विद्यमाने पानवळ महाविद्यालयात क्रांती दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी कोकण  मराठी परिषदेतर्फे स्वातंत्र्य सैनिक श्री. एस. आर. सावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोकण मराठी परिषदचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत व प्राचार्य गोविंद काजरेकर यांनी केले आहे.