Home स्टोरी कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या...

कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर.

133

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने कोमसापच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देणारे शाखेचे दिवंगत सदस्य, स्व.प्रा. मिलींद दत्ताजीराव भोसले व कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोमसाप शाखा सावंतवाडी तर्फे यंदाच्या वर्षी प्रथमच साहित्य शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याचे कोमसाप कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले त्यानुसार यंदाचे पुरस्कार स्व. प्रा ‌मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार निवेदक, आदर्श शिक्षक प्रा. संजय कात्रे माणगाव तर कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतिश पाटणकर सावंतवाडीयांना जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा 15 मार्च रोजी सकाळी दहा वाजता राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे मराठी भाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शालेय स्तरीय निबंध स्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला असून त्याचे बक्षीस वितरण याचवेळी होणार आहे.

यावेळी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकी अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, केंद्रीय कार्यकारणी सदस्य सौ. उषा परब, जिल्हा कार्यकारणी कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य विनायक गांवस, दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, ॲड. नकुल पार्सेकर उपस्थित होते.

दि. १५ मार्च रोजी सकाळी १० वा. राणी पार्वतीदेवी हायस्कूल सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती यावेळी राहणार आहे‌त.