सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा साहित्य चळवळ व्यापकतेने राबवत आहे. या शाखेचे कार्य कौतुकास्पद आहे. सातत्याने ही शाखा साहित्य सांस्कृतिक सामाजिक भान ठेवून. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना अपेक्षित असलेले कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. असेच काम टीमवर्कने करा. तुमचे काम वाखाण्याजोगे आहे. अशा शब्दात कोकण मराठी साहित्य परिषद च्या प्रांत अध्यक्ष सौ नमिता कीर यांनी गौरव उद्गार काढले. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाखा बांधणी केली आहे. असेही त्या म्हणाल्या. सौ कीर सावंतवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांचे स्वागत व त्यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन सावंतवाडी शाखा व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के व सावंतवाडी तालुका अध्यक्ष अँड. संतोष सावंत यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक हेमांगी नेरकर, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, प्रांत प्रतिनिधी ज्येष्ठ लेखिका उषा परब, प्रा. जी. ए. बुवा, तालुका सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दिपक तुपकर, अँड नकुल पार्सेकर प्रा, सुभाष गोवेकर, दीपक पटेकर, रामदास पारकर, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले, मंगल नाईक,. सुनील राऊळ. आधी उपस्थित होते. यावेळी सौ कीर पुढे म्हणाल्या कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई पासून ते कोकण सिंधुदुर्ग पर्यंत शाखा आहेत. साहित्य चळवळ प्रभावीपणे राबवली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अभिप्रेत असलेले काम केले जात आहे. त्यात सावंतवाडी शाखेचे काम उत्तम आणि उजवे आहे. या शाखेचा आदर्श इतर शाखा ने घ्यायला हवा. असेच काम टीमवर्कने करा. या शाखेची टीम साहित्य चळवळ मध्ये चांगले योगदान देत आहे. असे त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्याही कार्याचे त्यांनी कौतुक केले. ते सातत्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी कार्य करत आहेत. असे स्पष्ट केले. सावंतवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये आपण निश्चितपणे उपस्थित राहील अशी ग्वाही दिली.







