Home स्टोरी कोमसाप चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ वा वाढदिवसा निमित्त...

कोमसाप चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ वा वाढदिवसा निमित्त ‘पुस्तक तुला’ कार्यक्रमाचे आयोजन.

163

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ वा वाढदिवस सोहळा निमित्त येत्या २५ एप्रिल ला मुंबई येथे मुंबई शाखेच्या वतीने त्यांचा वाढदिवस सोहळा तसेच अभिजात मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कोमसाप ची स्वप्न स्फूर्ती सोहळा होणार आहे. या सोहळ्यात २५ एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये आपण मधुभाईंची पुस्तक तुला कार्यक्रम होणार आहे. ६५ किलो पुस्तके तुला मध्ये समाविष्ट असणार आहेत. ही पुस्तके रत्नागिरी मालगुंड येथील केशवसुत स्मारक येथे पुस्तकांचे दालन सुरू करण्यात येणार आहे त्या ठिकाणी कोकणातील साहित्यिकांची एकत्रित पुस्तक संच उपलब्ध होणारे ठिकाण ठरणार आहे. तरी आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुभाई यांच्या या ६५ किलो वजनाच्या पुस्तक तुला साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून साहित्यिकांची पुस्तके ग्रंथ ज्यांच्याकडे उपलब्ध असतील त्यांनी एका पुस्तकाच्या दोन प्रती येत्या २० एप्रिल पर्यंत खालील पत्त्यावर कृपया पुस्तके/ ग्रंथ पाठवावेत. जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के मुक्काम पोस्ट गुडीपूर पोस्ट पिंगळी तालुका कुडाळ या पत्त्यावर पाठवावेत मोबाईल नंबर 9890107352 या नंबर वर संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील तालुका निहाय कोकण मराठी साहित्य परिषद च्या शाखा आहेत . त्या शाखांचे यांच्याकडे ही पुस्तके ग्रंथ पाठवू शकता. सावंतवाडी तालुकाध्यक्षॲड संतोष सावंत, मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, कुडाळ तालुकाध्यक्ष सौ वृंदा कांबळी, कणकवली तालुकाध्यक्ष माधव कदम, यांच्याकडे जमा करावीत. असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के सचिव विठ्ठल कदम यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक साहित्यिक यांनी ग्रंथ व पुस्तक लिहिले असेल त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या ६५ किलो वजनाच्या तुला सोहळ्यासाठी. आपण आपले पुस्तक देऊन आपले सहकार्य करावे एका पुस्तकाच्या दोन प्रती देण्यामागे एक पुस्तक तुला सोहळ्यासाठी तर दुसरे पुस्तक हे जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषद संग्रही करून ठेवणार आहे. त्यामुळे दोन प्रति द्याव्यात ही विनंती.

प्रत्येक जिल्हा अध्यक्षांनी खालील पत्त्यावर कृपया पुस्तके/ ग्रंथ पाठवावेत.

 विद्या प्रभु, २३/१६२८, ओंकार सोसायटीअभ्युदयनगर, काळाचौकी मुंबई ४०००३३