सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत, कोषाध्यक्ष पदी अनंत वैद्य, जिल्हा प्रतिनिधी रुजा रिओ पिंटो, सहकार्यवाह सुरेश पवार, यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य प्राध्यापक संतोष वालावलकर, सुरेश ठाकूर, माधव कदम, संदीप वालावलकर, दीपक पटेकर, चिराग बांदेकर तर विविध समित्या प्रमुख पदी महिला साहित्य संमेलन सौ वृंदा कांबळी, जिल्हा साहित्य संमेलन विठ्ठल कदम, जनसंपर्क भरत गावडे, ग्रंथन निवड पुरस्कार अभिमन्यू लोंढे, सामाजिक कार्य प्रमुख रणजीत देसाई, प्रिंट मीडिया प्रमुख गणेश जेठे, विधी व कायदा ॲड अमोल सामंत, लेखापरीक्षण केशव फाटक, सोशल मीडिया निलेश जोशी आदींची जिल्हा कार्य कार्यकारणी निवडण्यात आली आहे.
कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय मध्ये ही निवड प्रक्रिया झाली. निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांची निवड प्रांत कार्यालयातून करण्यात आली होती. त्यांनी निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पाडली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा मंगेश मस्के यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी सर्वानुमते पसंती देण्यात आली. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव पदी सावंतवाडी शाखेचे माजी अध्यक्ष ॲड संतोष सावंत, कोषाध्यक्ष अनंत वैद्य यांची निवड करण्यात आली.
११ जणांची ही कार्यकारणी आहे. यावेळी आजच्या निवड प्रक्रियेला सौ उषा परब, सौ दिपाली काजरेकर, सुरेश पवार, संतोष वालावलकर, प्रा. सुभाष गोवेकर, विठ्ठल कदम, भरत गावडे ॲड संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, दीपक पटेकर, नकुल पार्सेकर, गणेश जेठे, महादेव कदम, संदीप वालावलकर, सुरेश ठाकूर, प्रा. रुपेश पाटील, रणजीत देसाई, बंड्या जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण मराठी साहित्य परिषदेची जिल्हा शाखेची निवडणूक बिनविरोध झाली आणि मंगेश मस्के व सर्व जिल्हा कार्यकारणी चे उत्तम योगदान आहे. त्याबद्दल कोकण मध्ये साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी विशेष अभिनंदन केले तर महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष तथा कोकण साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवन यांनीही फोन द्वारे अभिनंदन केले.