Home स्टोरी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी…..

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी…..

146

सावंतवाडी वार्ताहर: जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोकणातील वास्तव्य, गड किल्ले आणि या किल्ल्यावर जाण्यासाठी गावागावातून शिव वाटा याबाबतचा शिव इतिहास नव्या पिढीसमोर यावा तसेच शिवरायांचा कोकणातील साहित्यरुपी इतिहास यांचा शोध घेऊन कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे वर्षभरात कोकणातील शिवरायांच्या “शिव वाटा” पुस्तक स्वरूपात मांडण्याचा संकल्प आज शिवजयंती उत्सवा दिनी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे करण्यात आला.

जाणता राजा

छत्रपती शिवरायांच्या विचारांचे शिवा जागर साहित्य अभियान वर्षभर राबवण्यात येणार आहे असे ठरवण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन शिवजयंती उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील कक्षात साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पाळणा सजून त्यामध्ये शिवरायांचे शिवपुस्तक ठेवून “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा “ हे राज्य गीत गाऊन जन्मदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्षॲड संतोष सावंत यांनी अर्पण केला.यावेळी श्री सावंत म्हणाले महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोकणातील वास्तव्य आणि त्यांनी गड किल्ले उभारले. मावळ्यांना सोबत घेऊन बारा बलुतेदार यांच्या माध्यमातून शिवराज्य निर्माण केले. कोकणातील गावागावात शिवरायांचा पदस्पर्श झाला आहे. त्या शिववाटा अजूनही साक्षी आहेत. मात्र याबाबत म्हणावं तसं इतिहास रुपी पुस्तक किंवा त्याची जनजागृती आजच्या पिढीसमोर नाही. त्यामुळे हा कोकणातील शिव वाटाचा इतिहास पुस्तक स्वरूपात साहित्य संग्रहात उभा केला जाईल. पुढील शिवजयंतीला कोकणातील शिवरायांच्या वाटा हे पुस्तक सादर करण्यात येईल व त्यासाठी इतिहास संशोधकांचेही सहकार्य घेण्यात येईल. आणि या माध्यमातून नव्या पिढी समोर शिवजागर अभियान राबवण्यात येईल. यावेळी जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा होते. त्यांचे पर्यावरण आरोग्य आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते त्यांची साहित्य चळवळ फार मोठी होती आणि हेच साहित्य चळवळ आपण पुढे नेत आहोत.असे सांगितले. यावेळी जिल्हा खजिनदार भरत गावडे यांनी जाणता राजा शिवाजी महाराज यांचे स्मरण आणि आचरण आपण प्रत्येकाने करायला हवे असे सांगितले. यावेळी तालुका सहसचिव राजू तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोकणातील वास्तव्य आणि त्यांनी ज्या पद्धतीने इतिहास रचवला आणि युद्ध नीती कशी वापरली? आजही छत्रपती शिवारायांची युद्धनीती आर्मी व अमेरिकेतही वापरले जाते. कोकणातील त्यांचे वास्तव्य साहित्य स्वरूपात आपण मांडूया असे सांगितले. यावेळीम ॲड नकुल पार्सेकर, खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर, विनायक गावस यांनी श्रीमंत योगी अशी पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आली होती. ते योग्य पुरुष होते. त्यांनी चारशे वर्षांपूर्वी जो इतिहास रचवला तो आजही आपण आचरणात आणत आहोत. फक्त त्यांचे स्मारक उभारून होणार नाही. तर त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण त्यांचे विचार आचरणात आणायला हवे. असे ते म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, अनिल गोवेकर, आत्माराम परब, मनीष नाईक, प्रसाद परब, धैर्यशील परब आधी उपस्थित होते.

कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने शाळकरी मुलाला छत्रपती शिवाज्यांच्या बालपणाच्या आठवणीचे पुस्तक भेट देण्यात आले.

यावेळी छोट्या शाळकरी मुलाला छत्रपती शिवाज्यांच्या बालपणाच्या आठवणीचे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी शिवप्रेमी उपस्थित होते.