Home स्टोरी कोकणात होवसे सुहासिनी सौभाग्यवती घरोघरी हा उत्सव साजरा.

कोकणात होवसे सुहासिनी सौभाग्यवती घरोघरी हा उत्सव साजरा.

390

सावंतवाडी प्रतिनिधी: गौरी गणपती पूजन सिंधुर्गात ठिकठिकाणी घरोघरी करण्यात आले. कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौरी गणपती दिवशी होवसे सुहासिनी सौभाग्यवती घरोघरी हा उत्सव साजरा करतात. श्री गणेश चतुर्थीच्या चौथ्या दिवशी यंदा शुक्रवारी गौरी गणपती पूजन थाटात करण्यात आले. या दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नववधू गौरी गणपती सणात होवसणे ही प्रथा परंपरा चालत आली आहे. यंदा सावंतवाडी दोडामार्ग कुडाळ आधी तालुक्यात गौरी गणपती सण सुहासिनीने होवसा देऊन साजरा केला.

गौरीच्या आगमनाने आजचा दिवस प्रत्येक घरोघरी सुहासिनींसाठी आगळावेगळा असाच ठरला. सर्वत्र गावात आज सुहासिनी गौरी गणपतीचे वाण प्रत्येकाला देत होते. गौरी गणपतीचे विसर्जन काही गावात आज सायंकाळीच केले जाणार आहे. तर काही भागात उद्या शनिवारी सायंकाळी करण्याची प्रथा आहे.