Home स्टोरी कोईळ येथे आज २७ रोजी श्री समर्थ सद्गुरु साटम महाराज पुण्यतिथी कार्यक्रम...

कोईळ येथे आज २७ रोजी श्री समर्थ सद्गुरु साटम महाराज पुण्यतिथी कार्यक्रम !

142

मसुरे प्रतिनिधी: श्री समर्थ सद्गुरु साटम महाराज ८७ वा पुण्यतिथी सोहळ्या निमित्त २७ मार्च २०२४ रोजी श्री सद्‌गुरु समर्थ साटम महाराज मंदिर, जन्मगाव कोईळ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते १० वा.विधीवत पाद्यपुजा, सकाळी १० ते ११ वा. अभिषेक, दुपारी १२ ते १वा. महाआरती, तिर्थप्रसाद, दुपारी १ ते २ वा.महाप्रसाद, रात्रौ ठीक १० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना गुरुवर्य श्री. अभिषेक शिरसाट आणि श्री. संतोष शितकर बुवा यांचे शिष्य बुवा श्री. प्रथमेश चव्हाण विरुद्ध गुरुवर्य श्री. प्रकाश पारकर आणि श्री. ज्ञानदेव मेखी बुवा यांचे शिष्य बुवा श्री. अखिलेश फाळके यांच्यात हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री गणपती देवस्थान, कोईळ यांनी केले आहे.