सावंतवाडी प्रतिनिधी: कै.सौ.सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी मुक्ताई ॲकेडमीतर्फे एक दिवसाचे मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि. 2 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत शिबीर घेण्यात येईल.सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
विदयार्थ्यांना बुदधिबळ प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडुचे मार्गदर्शन लाभणार आहे.सहभागी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. विदयार्थ्यांनी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करायची आहे. प्रशिक्षण शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि उपाध्यक्षा सौ. स्नेहा पेडणेकर यांनी केले आहे.