सिंधुदुर्ग: सावंतवाडी येथील कै सुधाताई वामनराव कामत प्राथमिक शाळा क्रमांक २ या अद्यावत आणि आदर्श शाळेची नवीन इमारत उभी केली जाईल. या शाळेला सर्वतोपरी सहकार्य आणि मदत आपण निश्चितपणे करेन. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळेतील मुलांना गणवेश व बूट्स मोफत दिले जातील. असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
श्री केसरकर आज सावंतवाडी येथील सुधाताई कामत विद्यामंदिर शाळा क्रमांक २ या शाळेला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी या शाळेला संगणक उपलब्ध करून दिले होते त्याचे उद्घाटनही केले. येथील अंगणवाडी वर्ग खोलीची ही त्यांनी पाहणी केली. या शाळेच्या कार्यक्रमात शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदू गावडे यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना बोडके, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शाळा व्यवस्थापन पालक समितीचे अध्यक्षा नंदू गावडे, मुख्याध्यापिका श्रीमती खानोलकर, माजी नगरपालिका सभापती सुधीर आडिवरेकर, आबा केसरकर आधी शिक्षक पालक उपस्थित होते.
यावेळी श्री केसरकर पुढे म्हणाले की, या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व वर्गा खोल्यांमध्ये फॅनची व्यवस्था येत्या आठ दिवसात केली जाईल. ही शाळा आदर्शवत अशी शाळा असून या शाळेचे नवीन इमारत नगरपालिकेच्या बाजूलाच असलेल्या जागे त उभी केली जाईल. तसेच सुसज्ज मैदान आधी सर्व सुविधा या विद्यार्थ्यांना दिल्या जातील येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासन विविध उपक्रम राबवत आहे. आता पुस्तकाचे आणि दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांवर पडणार नाही. त्यासाठी पुस्तक आणि वही अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती खानोलकर यांनी केले.