कै. जयवंत लक्ष्मण सावंत यांना १७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपुर्ण श्रद्धांजली….!
मुठीत मावल्या नाही, उधळून गेल्यात “स्मृती ”
इंद्रधनुष्याचे सारे रंग, दाखवून गेल्या “स्मृती ”
जाणीव नेणिवेच्या पलीकडे, भेटवून गेल्या “स्मृती”
तोल ढळता ढळता, सावरून गेल्या “स्मृती”
समोर सावलीशी दिसली, बावरून गेल्या “स्मृती”
तमाची छाया घनदाट, उजळून गेल्या “स्मृती”
वियोगाचा वणवा उरी, पेटवून गेल्या “स्मृती”
ती शेज शरांची होती, जगवून गेल्या “स्मृती”
कोमजले होते आत काही, उमलून गेल्या “स्मृती”
साथ कधीही सोडणार नाही,सांगून गेल्या “स्मृती”
कै. जयवंत लक्ष्मण सावंत यांना भावपुर्ण श्रद्धांजली…!
भाऊ – सौ. व श्री. चिंतामणी, सौ. व श्री दीनानाथ, सौ. व श्री. सुधाकर, सौ. व श्री शरदचंद्र, सौ. व श्री. प्रताप आणि बहिण – जिजाबाई. तसेच सावंत परिवार
पत्ता: कलंबिस्त, गणशेळवाडी, ता. सावंतवाडी.