मळगाव: मळगाव येथील कैलासवासी उदयरामाकांत खानोलकर वाचन मंदिर च्या वतीने वाचक सभासद व वाचन प्रेमींसाठी खास दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली आहे. या दिवाळी अंक योजनेअंतर्गत दिवाळी अंकांचे प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रंथालयाचे व्यासंगी वाचक व माजी संचालक श्री विजय निगुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री महेश खानोलकर, कार्यवाह स्नेहा खानोलकर, श्री सचिन धोपेश्वरकर, श्री नितीन वराडकर, कु.सिद्धी खानोलकर, श्री हेमंत खानोलकर, श्री चंद्रकांत जाधव, श्री रितेश राऊळ, श्री बाबली नार्वेकर, श्री शांताराम गवंडे आदी मान्यवर उपस्थित होते
ग्रंथालयाच्या अनोख्या दिवाळी अंक योजनेअंतर्गत नाममात्र ₹.५०/- शुल्क भरून वाचनालयात उपलब्ध असलेले दर्जेदार दिवाळी अंक २४ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत वाचकांना घरी नेऊन वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून दिवाळी अंकातील साहित्य वाचन प्रेमीकडून वाचले जावे आणि वाचनाची प्रेरणा देखील इतरांना मिळावी, हा या योजनेमागील उद्देश आहे. सदर योजनेचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालया तर्फे करण्यात आले आहे.







