सावंतवाडी प्रतिनिधी: कै. व्दारकानाथ वामन पोतदार हे दिनांक १५/०७/२०१६ इ. रोजी कोल्हापूर येथे मयत झाले आहेत. त्यांनी त्यांचे हयातीत त्यांचे मालकिच्या स्थावर व जंगम मालमत्तांचे विल्हेवाटीसाठी दिनांक १४.१.२०१४ इ. रोजी रजिस्टर मृत्यूपत्र लिहून ठेवले होते की, श्री. व्दारकानाथ वामन पोतदार यांच्या मूत्यूनंतर त्याच्या मालमत्तेची मिळणारी रक्कम त्याचे नातेवाईक, दिव्यांग संस्था, कनब, मंदीर हे समाजोपयोगी, शैक्षणिक, आरोग्य विषयक, विविध खेळाविषयी, धार्मिक इ. ठिकाणी देणेबाबत मृत्यूपत्र लिहून ठेवलेले होते.
त्यामुळे दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी हि संस्था दिव्यांग व्यक्तीचा सर्वांगीण विकास, न्याय व हक्कासाठी सदैव कार्यरत असून दिव्यांगासाठी चागंल्या पध्दतीने काम करत असल्याने दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी या संस्थेचे सचिव श्री.एन.जी.देसाई याच्याकडे सूपुर्त करण्यासाठी अॅड. धनंजय रघुनाथ देशपांडे व श्री. समीर सुधीर गायतोंडे यांनी बांदा हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य श्री.एम. डी. मोरबाळे सर याचे मार्फत देणगी स्वरुपात रक्कम रु.१,००,०००/-चा धनादेश सचिव श्री.एन.जी. देराई याचेकडे सुपूर्त केला. व दिव्यांग व्यक्तीचा मुलांचा सर्वांगीण विकास करण्याबाबत आशिर्वाद दिला.