Home राजकारण केजरीवाल भ्रष्ट असेल तर या जगात कुणीच प्रमाणिक नाही! अरविंद केजरीवाल

केजरीवाल भ्रष्ट असेल तर या जगात कुणीच प्रमाणिक नाही! अरविंद केजरीवाल

55

मी पंतप्रधान मोदी यांना सांगू इच्छितो की, केजरीवाल भ्रष्ट असेल, तर जगात कुणीच प्रामाणिक नाही. आपल्याला माझ्या विरोधात एका पैशाचा जरी भ्रष्टाचार सापडला, तर मला जाहीर फाशी द्या. पण हा रोजचा तमाशा बंद करा, असे आव्हान देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. एवढेच नाही, तर केंद्र सरकारने आपल्या मागे, आपण चोर आहोत हे सिद्ध करण्यासाठी तपास संस्था लावल्या आहेत, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. पंजाबमधील लुधियानामध्ये ८० आम आदमी क्लिनिक समर्पित केल्यानंतर ते बोलत होते. केजरीवाल म्हणाले, केंद्र सरकारने सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स आणि पोलिसांना माझ्या मागे लावले आहे. का? तर, कुठल्याही प्रकारे हे सिद्ध करायचे आहे की, केजरीवाल चोर आहे. हे सिद्ध करायचे आहे की, तो भ्रष्टाचारात सामील आहे.

सीबीआयनं केली केजरीवाल यांची चौकशी– दिल्ली अबकारी धोरणप्रकरणी सीबीआयने केजरीवाल यांची चौकशी केली होती. या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आधीपासूनच कारागृहात आहेत. यावर, पंतप्रधान यांना आव्हान देत केजरीवाल म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, जर केजरीवाल भ्रष्ट आहे, तर या जगात कुणीच प्रमाणिक नाही. ज्या दिवशी आपल्याला केजरीवाल विरोधात एका पैशाचाही भ्रष्टाचार दिसेल, मला जाहीर फाशी द्या. पण ही रोजचीच नौटंकी बंद करा आणि तमाशा बंद करा.केजरीवाल म्हणाले, पंजाबमध्ये लोकांना क्वॉलिटी सर्व्हिस देणाऱ्या आम आदमी क्लिनिकची संख्या आता ५८० वर पोहोचली आहे. आबकारी धोरणप्रकरणात सीबीआयने केजरीवाल यांची १६ एप्रिलला चौकशी केली होती. एजन्सीने केजरीवाल यांना साक्षीदार म्हणून बोलावले होते.