२२ ऑगस्ट वार्ता: सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावरून आमदार बच्चू कडू यांनी “केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय, असं म्हणत जोरदार टीका केली आहे. कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करतं. मग दर पडल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही? असा प्रश्नहि आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला केला आहे.
सरकार खाणाऱ्यांचा विचार करतं. पण शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा विचार करत नाही. ही नालायक प्रवृत्ती असल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.