Home स्टोरी केंद्रशासनाच्या मिष्टी योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यात पर्यावण दिनी कांदळवन रोपवन कार्यक्रमाचे आयोजन!

केंद्रशासनाच्या मिष्टी योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यात पर्यावण दिनी कांदळवन रोपवन कार्यक्रमाचे आयोजन!

82

म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे): महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रांमध्ये सर्वाधिक क्षेत्र रायगड जिल्ह्यात आहे. एकूण 120 चौरस किमी पेक्षा अधिक विस्तीर्ण कांदळवन क्षेत्र आहे. किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकांच्या उपजीविकेसाठी महत्वाच्या असलेल्या कांदळवनांच्या संरक्षण आणि संवर्धनाला केंद्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देत मॅन्ग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाईन हॅबिटॅट्स अँड टॅनजिबल इनकम (मिष्टी-MISHTI ) हि योजना ५ जून २०२३ रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनापासून राबवण्याचे निश्चित केल्या प्रमाणे आज रोहा वनविभागा तील म्हसळा वनपरिक्षेत्रात मौजे वारळ येथील गट क्र. १३११ मधील ०.५ हेक्टर क्षेत्रात एकूण ५०० रोपे व ०.६१ हेक्टर क्षेत्रात एकूण ६१० रोपांची लागवड करण्याच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने निश्चित केले. देशांत एकूण ७५ स्थळांवर एकाच वेळी कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्रातील १५ विविध खाजण क्षेत्रातील स्थळांवर कांदळवन रोपण करण्याचा मूईत साधण्यांत आला. या मध्ये रायगड लोकसभा मतदार संघातील श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील म्हसळा तालुक्यांतील वारळ चा समावेश आसत्त्याचे रोहा वन विभाग उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी सांगितले.

निकत यांच्या प्रमुख उपस्थितीत, म्हसळा परिक्षेत्र वन आधिकारी संजय पांढरकामे, माणगाव परिक्षेत्र वन आधिकारी  अनिरुद्ध ढगे यांच्या हस्ते कांदळवन रोपे लावण्यात आली.या वेळी रा.काँ.तालुका अध्यक्ष समीर बनकर,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,उदय कळस, बाबू शिर्के .वनरक्षक सागर घुबे,आनंद वरशीळ, संजय नाईकनवरे,रुपेश देवरे,प्रथमेश बारे, विराज दाभोळकर,त्रिवेणी शेलुलकर,माजी सरपंच जहुर काझी,सरपंच रमेश खोत,निलेश मांदाडकर,मधुसुदन पाटील,सुनित सावंत, ,शाम तिवरेकर ,संजय चांदोरकर, रुपेश आंबेतकर, यशवंत म्हात्रे,नथुराम पाटील, डि.के.पाटील, विनोद कांबळी, निलीमा चांदोरकर, सुनंदा आंबेतकर, शोभा वालवटकर, रंजना नागोटकर, प्रकाश नागोटकर. जय‌‌श्री म्हात्रे.वारळ, खरसई आणि काळसुरी गावांतील कांदळवन संरक्षण समिती पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ऑनलाईन पद्धतीने देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यानी देशातील एकूण ७५ स्थळांवर एकाच वेळी नागरिकाना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या केंद्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देत मॅन्ग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाईन हॅबिटॅट्स अँड टॅनजिबल इनकम (मिष्टी-MISHTI ) हि योजना देशांत आज दि. ५ जून २०२३ रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु झाल्याचे घोषित केले. मिष्टी योजना देशातील ९ किनारी राज्य व ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविली जाणार आहे.या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने ५ जून २०२३ रोजी देशाच्या अमृतमोहोत्सवात देशातील एकूण ७५ स्थळांवर व त्यात महाराष्ट्रातील १५ स्थळांत कांदळवन रोपण केले गेले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात मौजे वारळ येथील दोन ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे. या योजनेमुळे कांदळवनांचे पुनर्संचयन होवून स्थानिकांना नवीन उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील तसेच निसर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळेल. वारळ येथील दोन्ही ठिकाणी प्राथमिक स्वरूपात प्रत्येक ठिकाणी २०० रोपांची लागवड करण्यात आली आशी माहिती रोह्याचे उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांनी दिली आहे. आयोजीत कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पर्याववणाचे संरक्षण व संवर्धन बाबत भारत सरकारचे योगदान काय आहे याची माहिती व संदेश उपस्थितांना दूरदर्शनाचे माध्यमातून प्रदर्शित करून दाखविण्यात आला.पंतप्रधानानी शेतकऱ्यानी भविषयांत गोवर्धन योजना, बायोगॅस फ्लँट, नैसर्गिक शेती कडे वळणे आवश्यक आसल्याचे सांगितले. देशांतील शेतकऱ्याना केंद्राने सॉईल हेत्थ कार्ड दिले आहे त्याचा उपयोग करावा असे आवाहन केले.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्याबरोबरच केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री.भूपेंद्र यादव यांनी वेबिनारद्वारे कांदळवन संवर्धना बाबत संदेश दिला. आपल्या पूर्वजांकडून खाऱ्या पाण्यापासून शेतीचे संरक्षण होण्यासाठी कांदळवने राखली जात होती. ती परंपरा कायम राखण्याची आवश्यकता आहे असे आभ्यासू मत  त्यानी मांडले.फोटो