Home स्टोरी केंद्रप्रमुख प्रशांत पारकर यांचा कांदळगाव येथे सन्मान!

केंद्रप्रमुख प्रशांत पारकर यांचा कांदळगाव येथे सन्मान!

169

मसूरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील कोळंब केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नतीने नेमणूक झालेले मसुरे देऊळवाडा शाळेचे पदवीधर मुख्याध्यापक व कांदळगावचे सुपुत्र श्री प्रशांत पारकर यांचा आज कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिर येथे मालवण चे उद्योगपती तथा शिवसेना जिल्हा प्रमुख श्री दत्ता सामंत यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब, मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक श्री दीपक पाटकर, सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश कोदे, अर्चना कोदे, देवस्थान कमिटीचे श्री बाबू परब, श्री संतोष परब,श्री बाबू राणे, श्री बापू गुरव, श्री दादा परुळेकर, श्री शामसुंदर मुळये, प्रवीण पारकर, राजेंद्र प्रभुदेसाई, उदय परब, सोनाली कोदे तळाशिलकर, सौ शारदा मूळये, श्री विहार कोदे, सौ भाग्यश्री डिचवलंकर, श्री प्रभाकर सुर्वे, विजय नातू उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेल्या बारा वर्षे केंद्रप्रमुख पदोन्नती केली नव्हती. गेल्या बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 19 केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. यामध्ये मालवण तालुक्यामध्ये चार केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झाल्याने श्री प्रशांत पारकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.