Home स्टोरी कृष्णकुमार प्रभू यांचे निधन…!

कृष्णकुमार प्रभू यांचे निधन…!

69

मसुरे प्रतिनिधी: बांदिवडे येथील मूळ रहिवासी आणि सद्यस्थितीत कणकवली कलमठ येथे वास्तव्यास असणारे निवृत्त पोस्ट मास्तर तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार मारुती प्रभू (वय ७९) वर्षे यांचे रविवारी निधन झाले.

कृष्णकुमार प्रभू यांनी चाळीस वर्ष पोस्ट ऑफिस मध्ये सेवा केली होती. २००५ मध्ये पोस्ट मास्तर म्हणून कणकवली पोस्ट कार्यालयातून ते सेवानिवृत्त झाले होते . कबड्डी या खेळामध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले होते. त्या काळात त्यांनी व्यायाम शाळा सुद्धा काढून तरुणांना एक अनोखे दालन निर्माण करून दिले होते.

कृष्णकुमार प्रभू यांनी पोस्टल युनियन संघटना सिंधुदुर्गचे पंधरा वर्षे अध्यक्ष पद तसेच बांदिवडे देवस्थान अध्यक्ष पद, नाम सप्ताह मंडळ बांदिवडे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. अनेक समाज सेवा संघटनांमध्ये ते कार्यरत होते. बांदिवडे गावच्या विविध धार्मिक, कला, क्रीडा, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. विविध विकासात्मक कामांचाही त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता सर्वांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगले वक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. मराठी,हिंदी, इंग्लिश या भाषांवर त्यांचे मोठे प्रभुत्व होते. धार्मिक आणि राजकीय या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून युवा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद प्रभू , भूषण प्रभू आणि कृषी पर्यवेक्षक प्राची सावंत यांचे ते वडील होत.