मसुरे प्रतिनिधी: कुणकेश्वर येथे झालेल्या देवगड तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुणगे हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये१४ वर्षांखालील मुलां च्या गटातून जनार्दन लक्ष्मण पटकारे ३५ किलो वजनी गटातून तर अथर्व दयानंद पटवर्धन६० किलो वजनी गटातून प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे.
त्याचबरोबर चैतन्य संजय रूपे ४० किलो वजनी गटातुन द्वितीय क्रमांक, रिषभ योगेश धुवाळी याने ४२किलो वजनी गटातून तृतीय क्रमांक तसेच १७ वर्षांखालील जय पुरुषोत्तम सावंत ६० किलो वजनी तृतीय क्रमांक असे यश मिळवले.सर्व विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक हरिदास महाले आणि प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.







