सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग नगरी जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग पोलीस परेड ग्राउंड वर पार पडलेल्या जिल्हास्तरीय मुख्य गणतंत्र दिवस सोहळा पार पडला. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रविंद्रजी चव्हाण यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने गेल्या वर्षी मुख्य गणतंत्र दिवस शिबिरामध्ये सहभागी झालेली कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी विद्यार्थिनी कुमारी सार्जंट स्वरांगी संदीप खानोलकर व तिचे प्रशिक्षक फर्स्ट ऑफिसर गोपाळ भिवा गवस यांचा गुणगौरव करण्यात आला. यापूर्वी स्वरांगीच्या बहुमोल कामगिरीबद्दल विविध संस्थांकडून तिचा गुणगौरव सोहळा पार पडला होता.


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे दिल्ली दरबारी माध्यमिक विभागातून प्रतिनिधित्व करणारी स्वरांगी संदीप खानोलकर ही पहिलीच विद्यार्थिनी होती. खडतर मेहनत आणि कष्टाच्या जोरावर तिने हे यश मिळवले यामध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य एन.पी. मानकर तसेच विद्यालयाचे असोसिएट एन.सी.सी. ऑफिसर गोपाळ गवस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.