देवगड प्रतिनिधी: कुणकेश्वर येथील घाटीचा गणपती मंदिर येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी विधिवत पूजा, अभिषेक, आरती महाप्रसाद, हळदीकुंकू आदी कार्यक्रम झाले.रात्री बुवा रवींद्र घाडी यांचे भजन झाले. यावेळी सरपंच महेश ताम्हणकर, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली, आणि ट्रस्ट सदस्य, माजी सरपंच गोविंद घाडी, ग्रामसेवक श्री पाटील, कुणकेश्वर ग्रामपंचायत कर्मचारी, डॉ. मांडवकर मैडम आदी सह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.सदर मंदिर हे स्वयंभू आहे. दिरबा देवी महाशिवरात्र वेळी गणपती दर्शन घेऊन पुढे जाते.







