Home स्टोरी कुणकेरी येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..! केतन सावंत

कुणकेरी येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..! केतन सावंत

64

सावंतवाडी प्रतिनिधी: कुणकेरी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व दत्त जन्मोत्सव सोहळा या कार्यक्रमाची उद्या दत्त जन्मोत्सव सोहळ्याने सांगता होईल आठ दिवस चालू असलेला कार्यक्रम त्या कार्यक्रमाची सांगता शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा तीर्थ व महाप्रसाद यांनी होईल. तसेच वै. ह.भ. प. लक्ष्मण विठ्ठल सावंत यांच्या स्मरणार्थ दत्त जयंती उत्सवानिमित्त शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलेले आहे .जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री. निलेश अटक यांच्याद्वारे आरोग्य चिकित्सा होणार आहे तरी सर्व भक्त भाविकांनी सकाळी दहा ते पाच या दरम्यान या मोफत शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रिय जादूगर केतन सावंत यांनी केले आहे.