Home स्टोरी कुडाळ सकल मराठा समाजाकडून यंदाही “शिवजयंती उत्सव-२०२३” जल्लोषात साजरा होणार….

कुडाळ सकल मराठा समाजाकडून यंदाही “शिवजयंती उत्सव-२०२३” जल्लोषात साजरा होणार….

60

सावंतवाडी वार्ताहर : कुडाळ सकल मराठा समाजाकडून दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मोठ्या प्रमाणात “शिवजयंती महोत्सव दिनांक १९ फेब्रुवारी २०२३” रोजी जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी मालवणच्या सिंधुदुर्ग किल्यावरून शिवज्योत घेऊन मावळे सकाळी १०.३० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडे येतील. त्यानंतर शिवज्योतीचे मिरवणूकीसह जिजामाता चौकात आगमन होईल व शिवजन्म सोहळा साजरा होईल.

पाळणा गाऊन महाराजांच्या जन्मोत्सवाचा शुभारंभ होईल. या सोहळ्याला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित असेल. त्यानंतर राजमाता जिजाऊना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजनगर मध्ये महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल व दर्शनासाठी शिवज्योत तेथे ठेवली जाईल. सायंकाळी ठीक ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये शिवचरित्रावर आधारीत नृत्याविष्कार, नाटिका व मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम कुडाळ जिजामाता चौक ह्या ठिकाणी होणार आहेत.तरी या उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.