Home क्राईम कुडाळ शहरात तिन पानस्टॉल वर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई….!

कुडाळ शहरात तिन पानस्टॉल वर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई….!

230

६ हजार ५४७ रू. चा गुटखा जप्त: तिघांवर गुन्हा दाखल….

 

 

कुडाळ: कुडाळ शहरातील पान स्टॉल व दुकानांवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.आरोग्यास घातक असलेला, अपायकारक व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखाची विक्रीसाठी साठवणूक व विक्री करून अन्न सुरक्षा व मानके कायदा व आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या पथकाने ही कारवाई केली.यानुसार गुरूवारी दुपारी १२.१५ बाबा चॉंद पान स्टॉल कुडाळ पानबाजार बाबा चॉंद दरगाह जवळ येथे या विभागाने छापा टाकला यावेळी दुकानाची तपासणी केली असता हमीद नियाज शेख ४५ रा पानबाजार यांच्या स्टॉलवर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला विमल पानमसाला , आर एम डी पानमसाला नजर यासारखा १ हजार ९३४ रूपये किमतीचा सापडलेला गुटखा जप्त केला. यानंतर पानबाजार कुडाळ येथे दुसरा छापा टाकला. येथील इम्रान चॉंदसाहब मुजावर ४२ पानबाजार कुडाळ यांच्या दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला १ हजार १०५ रू किंमतीचा विमल, नजर, आर एमडी यासारखा गुटखा जप्त केला. यानंतर कुडाळ बस स्थानक समोर मे राजाराम लक्ष्मण सावंत पानस्टॉल वर छापा टाकला. राजाराम लक्ष्मण सावंत ४५ रा देऊळवाडी बांबुळी यांच्या पान स्टॉल वर नजरसह ३ हजार ५०८ रूचा गुटखा आढळून आला . हा गुटखा जप्त केला. या तीनही कारवाईत 6 हजार 547 रू चा गुटखा जप्त करण्यात आला आहे. आरोग्यास घातक असलेला, अपायकारक व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखाची विक्रीसाठी साठवणूक व विक्री करून अन्न सुरक्षा व मानके कायदा व आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी हमीद नियाज शेख ,इम्रान चॉंदसाहब मुजावर व राजाराम लक्ष्मण सावंत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.