खा. विनायक राऊत, वरुण सरदेसाई, आ. वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती
सिंधुदुर्गात आ.आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांकडून जंगी स्वागत….
आमदार वैभव नाईक यांच्या घरी दिली सदिच्छा भेट….
सिंधुदुर्ग: खळा बैठकांच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांचे कुडाळ व कणकवली तालुक्यात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक व शिवसैनिकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील बांबर्डे येथे शिवसेना महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी यांच्या घरी व कणकवली तालुक्यात विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या घरी आ. आदित्य ठाकरे यांनी खळा बैठक घेतली. या खळा बैठकांना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी आ. आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. शिवसेना नेते खा. विनायक राऊत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई,आमदार वैभव नाईक,संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, समन्वयक प्रदीप बोरकर,कोकण पदवीधर निवडणूक प्रमुख किशोर जैन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान आ. आदित्य ठाकरे यांनी कणकवली येथे आमदार वैभव नाईक व युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तसेच कुडाळ येथे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे औक्षण करत शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेकांनी त्यांच्या समवेत सेल्फी फोटोचा आनंद घेतला.
यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,युवासेना विस्तारक अमित पेडणेकर,विक्रांत जाधव, रुची राऊत,अमरसेन सावंत,संग्राम प्रभुगावकर, राजन नाईक, हरी खोबरेकर, बबन बोभाटे,स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, सुशील चिंदरकर, मंदार ओरसकर, योगेश धुरी, सचिन सावंत,शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, वैदेही गुडेकर, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर, उत्तम लोके, गणेश गावकर, फरीद काझी,रोहित पावसकर यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.