Home स्टोरी कुडाळ येथील युवक फिट येऊन रस्त्यावर पडला..! सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राने केले...

कुडाळ येथील युवक फिट येऊन रस्त्यावर पडला..! सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राने केले रुग्णालयात दाखल.

168

सावंतवाडी: कुडाळ येथे युवक फिट येऊन रस्त्यावर पडला. या व्यक्तीला सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राने यांनी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे नाव रामदास भगवान राणे वय वर्षे ४२ असूनह तो व्यक्ती गणेश नगर, कुडाळ येथील रहिवासी आहे. ही घटना मोती तलावाच्या बाजूला संध्याकाळी सहा वाजता घडली. सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे, रवी जाधव व सामाजिक कार्यकर्ते अजित सांगेलकर यांनी रस्त्यावरून उचलून त्याला रुग्णालयात दाखल केले. सदर युवकाला फिट येऊन पडला असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. त्याच्यावर उपचार चालू आहेत. सदर युवकाला जास्त काही आठवत नाही. सदर युवकाची ओळख पटल्यास सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव किंवा रूपा मुद्राडे यांची संपर्क साधा 9422633971