विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन…
सिंधुदुर्ग: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला आहे. त्यामध्ये वर्दे सरपंचपदी पप्पू पालव, वालावल हुमरमळा सरपंचपदी अमृत देसाई, हुमरमळा अणाव सरपंचपदी समीर पालव हे विजयी झाले आहेत. या सर्व विजयी सरपंचांचे व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.