सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बजेट अंतर्गत ग्रामीण मार्ग बिळवस प्र.जी.मा. ३२ ते सातेरी मंदिर मार्ग मजबुतीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी १० लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२०२३ अंतर्गत बिळवस धाकु धाम ते सातेरी जलमंदिर मार्ग ग्रा. मा.२६९ या कामासाठी १० लाख रुपये, बिळवस प्र.जी. मा. ३२ ते सातेरी मंदिर मार्ग खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ५ लाख रुपये मंजूर कारण्यात आले आहेत. ग्राम सेवा मंडळ चे अध्यक्ष व माजी मुख्याध्यपक सूर्यकांत पालव यांच्या हस्ते नारळ फोडून या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपतालूका प्रमुख छोटू ठाकूर, उपसरपंच मसुरे पिंट्या गावकर,वासू चव्हाण, अशोक बागवे, अमित भोगले, सुहास पेडणेकर, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, शाखाप्रमुख रामचंद्र पालव, उपशाखा प्रमुख रमेश फणसे, अध्यक्ष मुंबई मंडळ सूर्यकांत पालव, चिटणीस अशोक पालव, माजी नायब तहसीलदार जयराम पालव, माजी पोलिस पाटील विकास सावंत, माजी अध्यक्ष सातेरी देवालय ट्रस्ट आनंद पालव,ग्राम पंचायत सदस्य प्रकाश फणसे, शिवसैनिक मोहन पालव, संकेत पालव, प्रशांत फणसे, विलास शृंगारे, सुजित पालव, आदित्य सावंत, रोहित सावंत, तुषार पालव, भाई माधव, अशोक पालव, अथर्व पालव,रमेश पालव, रुपेश सावंत, सर्वेश सावंत, आनंद साळुंके, अनिल सावंत, गोपाळ पालव, शुभम वारंग,सुबोध फणसे आदी शिवसैनिक उपस्थित होते.







