कुडाळ: (आबा खवणेकर):काल शनिवारी सायंकाळी रात्री कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिमगोत्सव कार्यक्रम पार पडला.यावेळी गर्दीचा उचांक पहायला मिळाला अनेक रोंबाट,राधा नृत्यांनी लक्ष वेधून घेतले.यावेळी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांचा कुडाळ तालुक्यांच्या वतीने गदा देऊन सन्मान करण्यात आला आला. यावेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली. मात्र शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांच्या तडाखेबाज भाषणाला उपस्थितीत रसिकांनी टाळ्यांच्या आणि शिट्टयांनी दाद दिली. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळसाठी क्रिडांगण मंजुर केल्याने सर्वांनाच फायदा होत असल्याने उपस्थित रसिकांनी आमदार नाईक यांचे आभार व्यक्त केले.
कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या आणि पदाधिकारी यांच्या योग्य नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,कुडाळ तालुका शिवसेना प्रमुख राजन नाईक,कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेनेचे राजु गवंडे, कुडाळ तालुका अल्पसंख्याक तालुका प्रमुख अष्पाक कुडाळकर, कुडाळ युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी,श्रृती वर्दम,उदय मांजरेकर, किरणं शिंदे,गुरु गडकर, अमित राणे संतोष अडुरकर,सुधीर राऊळ,मथुरा राऊळ,श्रेया परब आदी उपस्थित होते.