Home स्टोरी कुडाळ मधील दोन मनोरूग्ण बांधव आश्रय आणि सुरक्षिततेसाठी संविता आश्रमात दाखल…!

कुडाळ मधील दोन मनोरूग्ण बांधव आश्रय आणि सुरक्षिततेसाठी संविता आश्रमात दाखल…!

141

कुडाळ प्रतिनिधी: समाजात विविध कारणांनी दिवसें दिवस मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचे प्रमाण वेगाने वाढत चालले असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरांत आणि खेडोपाड्यांत स्वतःचे भान नसलेली अनेक माणसं आपल्या अवतीभवती निराधार आणि वंचित जीवन जगताना आढळत आहेत.

 

जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रमात नुकतेच दि.२७ फेब्रुवारी,२०२४ रोजी एकाच दिवशी एक स्री आणि एक पुरूष अशा दोन मनोरूग्ण बांधवाना कुडाळ पोलिस स्टेशन मार्फत दाखल करण्यात आले आहे.

आश्रमात दाखल करण्यात आलेली महिला मनोरुग्ण

कुडाळ काळप नाका परिसरातून सकाळी ९-०० वाजता दाखल करण्यात आलेल्या महिलेने तीचे नाव निर्मलादेवी रमेश वसावे (वयः वर्षे ५० ) असे सांगीतले असून ती मुळ नागपूरकडील असल्याचे समजते. सदर महिलेला तीच्या नातलगांचा पत्ता सांगता येत नाही. याचप्रमाणे कुडाळ पेट्रोल पंपाजवळ आढळून आलेला दुर्गाप्रसाद (वयः३८) दक्षिण भारतीय असल्याचे दिसत असून तोही त्याच्या नातलगांची माहिती सांगू शकलेला नाही.

 

आश्रमात दाखल केल्यानंतर जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी दुर्गाप्रसाद यास तर महिला काळजीवाहकांनी निर्मलादेवी स्वहस्ते आंघोळ घालून स्वच्छ केले. दोन्ही रूग्ण बांधवांवर मानसोपचारतज्ञ डाँ. धुरींच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत.