Home स्टोरी कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या स्वच्छ आणि सुंदर अभियान उपक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दाद.

कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या स्वच्छ आणि सुंदर अभियान उपक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दाद.

84

कुडाळ: कुडाळ औद्योगिक वसाहतीने गेल्या वर्षापासून वर्षापासून स्वच्छ व सुंदर औद्योगिक वसाहत अभियान हाती घेतले आहे.या अंतर्गत गेल्यावर्षी पाचशे (५००) सुरंगी व कोकमच्या झाडांची रस्त्याच्या दुतर्फ लागवड करून त्याचा सांभाळ केला जात आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गेले 35 वर्ष टाकलेला कचरा लोकसहभागातून स्वच्छ करून या औद्योगिक वसाहतीला सुंदर बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेऊन या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी 200 दुर्मिळ वृक्षांची भेट कुडाळ एम.आय.डी.सी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मोहन उडावडेकर यांच्याकडे प्रदान करण्यात आली. अलीकडे असोशियन संकुल येथे हा वृक्ष प्रधान कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी मनसेचे जिल्हा अध्यक्ष श्री.धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष श्री.कुणाल किनरेकर ,तालुका अध्यक्ष श्री.हेमंत जाधव, श्री जगन्नाथ गावडे,उपतालु काध्यक्ष श्री. गजानन राऊळ.पिंगुळी विभाग अध्यक्ष श्री.प्रथमेश धुरी, विभाग अध्यक्ष नेरुर श्री शैलेश हडकर, शाखा अध्यक्ष हुमरस श्री.संदेश रेडकर,माजी उपतालुका अध्यक्ष श्री. जगन्नाथ गावडे, श्री.अक्षय जोशी विद्यार्थी सेनेचे श्री.य तीन माजगावकर ,श्री अनिकेत ठाकूर आदी मनसे सैनिक उपस्थित होते.