Home स्टोरी कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समितीचे हे आंदोलन का व कशासाठी?

कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समितीचे हे आंदोलन का व कशासाठी?

72

सिंधुदुर्ग: कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समितीचे हे आंदोलन कुडाळ हायस्कूल विरुद्ध, किंवा कोणत्याही एका व्यक्तीविरुद्ध ,जातीविरुद्ध, किंवा वैयक्तिक संस्थाचालक सदस्या विरुद्ध नसून, संस्थाचालकानी जे इंग्लिश मीडियम स्कूल चे नामांतरण केले गेले त्या निर्णयाविरुद्ध आहे. कुडाळ हायस्कूल परिसरामधील इंग्लिश मीडियम माध्यमाच्या इमारतीला डॉक्टर अनिल नेरुकर इंग्लिश मीडियम हायस्कूल हे नाव अचानकपणे दोन ते तीन वर्षांपूर्वी देवुन त्या नावाचा बोर्ड लावण्यात आला. खरंतर कुडाळ इंग्लिश मीडियम ची ही इमारत गेली २०-२५ वर्षामध्ये आजी, माजी विद्यार्थी, व कुडाळ, व कुडाळ हायस्कूल वर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या सहभागातून व आर्थिक मदतीतून उभारली आहे. असे असताना कुणीतरी एखादी व्यक्ती आता जादा आर्थिक मदत देतो म्हणून त्या पैशाच्या मोबदल्यात त्या व्यक्तीचे नाव कुडाळतील नागरिकांना विचारात न घेता कुडाळ इंग्लिश मीडियम स्कूलला दिले गेले. आणि हा निर्णय संस्थेने परस्पर घेतल्यामुळे कुडाळातील आजी-माजी विद्यार्थी व नागरिकांना पटला नसल्याने त्या निर्णयाविरुद्ध हे आंदोलन चालू आहे. कुडाळ इंग्लिश मीडियम स्कूल संघर्ष समिती हे पण सांगू इच्छिते की डॉक्टर अनिल नेरुरकर यांची आर्थिक मदत घेण्यास काहीही हरकत नाही त्यासाठी त्याचे त्या इमारतीत असलेल्या एखाद्या सायन्स लॅबला, सभागृहाला किंवा काही खोल्यांना त्यांचे नाव देण्यास हरकत नाही. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती एखाद्या मोठ्या भिंतीवर प्रसिद्ध केली तरीही चालु शकते. परंतु सर्वांच्या सहकार्यातून आज उभे राहिलेल्या इमारतीला फक्त त्यांचे एकट्याचे नाव देऊ नये जेणेकरून एक चुकीचा पायंडा कुडाळच्या शैक्षणिक क्षेत्रात रोवला जाऊ नये यासाठी कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समिती आंदोलन करत आहे.

हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून कुडाळच्या नागरिकांनी कुडाळ नावाच्या अस्मितेसाठी पुढे येऊन केलेले हे आंदोलन आहे.