उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याची आतापर्यंत दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय यंत्रणांची जप्त केली आहे. यातील काही संपत्ती अतिक याच्या नावावर, तर काही त्याच्या जवळच्या लोकांच्या नावावर होती. या संपत्तीमध्ये रोख रक्कम, दागिने, भूमी आणि इमारती यांचा समावेश आहे. अतिक याने ही संपत्ती गुंडगिरीद्वारे अवघ्या २० वर्षांत गोळा केली होती.