Home स्टोरी किल्ले भरतगड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

किल्ले भरतगड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

65

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील मसुरे येथील किल्ले भरतगड येथे प्रथमच ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मसुरे पोलीस अंमलदार संजय हुंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी मसुरे पोलीस काँस्टेबल तुषार वाघाटे तसेच मसूरे गावातील पोलीस पाटील, होमगार्ड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.