किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी दोन आरोपींना विशेष तपास पथकाने सोमवारी रात्री अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलिसांनी आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने विनंती मान्य करत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. डी. गुरनुले यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेख अश्पाक शेख मुसा वय वर्ष ३० आणि शेख जावेद शेख कलीम वय वर्ष २९, रा. शहागंज अशी आरोपींची नावे आहेत.