Home स्पोर्ट किकबॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वर्चस्व..! ६ सुवर्ण, ९ रौप्य, १२ कांस्य...

किकबॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वर्चस्व..! ६ सुवर्ण, ९ रौप्य, १२ कांस्य पदकांची कमाई..!

121

सिंधुदुर्ग: जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. बांदा, सावंतवाडी, मळगाव आणि शिरोडा या भागातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत एकूण २७ पदकांची कमाई केली.

 

स्पर्धेतील एकूण निकाल पाहता – ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकं पटकावण्यात आली असून, या विजयात सर्व वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळ सादर केला. रिंगमध्ये दर फटक्यावर प्रेक्षकांचा जल्लोष, पंचांचा सतर्कपणा आणि खेळाडूंचा प्रचंड आत्मविश्वास – या सगळ्यामुळे संपूर्ण वातावरण थरारक झाले होते.

 

प्रशिक्षक श्री. किरण देसाई यांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच खेळाडूंनी अशा उच्च दर्जाची कामगिरी उभी केली. त्यांनी शिस्त, फिटनेस आणि तांत्रिक कौशल्यावर भर देत खेळाडूंना कठोर प्रशिक्षण दिले. या यशामागे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेचा सक्रीय सहभाग यांचा समन्वय आहे. सध्या या विजेत्यांचे गावोगावी सत्कार होत असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या चमकदार यशाला पुढे नेत, आपल्या भागातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे. अशी आता सर्वांच्या मनात एकच अपेक्षा आहे.