Home स्टोरी किकबॉक्सिंग चॅम्पियन मिथीलेश बडोलिया यांचा काँग्रेस नेते अरविंदजी शिंदे यांच्या वतीने सत्कार…!

किकबॉक्सिंग चॅम्पियन मिथीलेश बडोलिया यांचा काँग्रेस नेते अरविंदजी शिंदे यांच्या वतीने सत्कार…!

139

पुणे: ७ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या तिसऱ्या वाको ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये मिथीलेश बडोलिया यांने भारतासाठी २ सुवर्णपदके आणि १ कांस्य पदक मिळवले. ज्यामध्ये २४ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. त्याने उझबेकिस्तानच्या खेळाडूवर ९-४ फरकाने विजय मिळवला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांनी त्याचा सत्कार केला.यावेळी युवक व क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे आणि खडकी युवक व क्रीडा सेलचे अध्यक्ष जुबेर शेख हे उपस्थित होते.