कणकवली: महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा जिल्हास्तरी मेळावा कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक पतपेढीच्या सिंधुदुर्ग नगरीच्या सभागृहात संपन्न झाला . कार्यक्रमाचे स्वागत नी प्रास्ताविक महासंघाचे सचिव किशोर कदम यांनी केले .
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे महासचिव सुरेश तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले .सदर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक पद्मश्री परशुराम गंगावणे उपस्थित होते .तसेच कास्ट्राईब संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी गणेश मडावी कार्याध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ , सुमित भुईगड वरिष्ठ उपाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ , सुधाकर कांबळे जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ रत्नागिरी , कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महासचिव किशोर कदम ,माध्यमिक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंडुरकर , महासचिव अभिजित जाधव ,प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर ,महासचिव मनोजकुमार अटक , पर्यवेक्षिका जिल्हाध्यक्षा उल्का खोत , महासचिव लिना कडुलकर , ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर ,महासचिव प्रशांत जाधव , वाहनचालक संघटना जिल्हाध्यक्ष संजय कदम , महासचिव प्रकाश गोसावी , आरोग्य संघटना कार्याध्यक्ष महेंद्र कदम महासचिव अविनाश धुमाळे ,मुण्मयी जाधव ,विश्वनाथ कदम , सुदीप कांबळे , संजय जाधव , सुर्यंकात साळुंखे , किशोर यादव , नचिकेत पवार , संदीप नागभिडकर , दिपक कांबळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा व तालुका स्तरिय पदाधिकारी उपस्थित होते .
सदरवेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव तथा जिल्हा मेळाव्याचे उद्घाटक सुरेश तांबे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण जिल्हा पातळीवर नी मंत्रालयीन स्तरावर नेहमीच कार्य तत्परपणे काम करत आहे . आजचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा जिल्हामेळावा अत्यंत मोठया उत्साहात साजरा होत असल्याने मला आनंद होत असल्याचे सांगितले . समाजभुषण संदीप कदम यांच्या सारखे दमदार नेतृत्व राज्य आणि जिल्हास्तरावर कास्ट्राईब संघटनेला मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे प्रश्न चुटकी सरशी सुटतात असे सुरेश तांबे यांनी सांगितले .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी कास्ट्राईब संघटना सर्व प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकी साठी खुपच सक्रियपणे काम करत असल्याचे सांगितले . तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची बाजु घेवून ठामपणे लढणारी एकमेव संघटना असल्याचे सांगितले . सद्याच्या काळात संघटनेची गजर असुन भविष्यात कर्मचाऱ्यां बाबतीत अनेक आव्हाने असल्याचे ते म्हणाले .
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी अत्यंत छानदार असा जिल्हामेळावा आयोजित केल्या बद्दल जिल्हास्तरिय पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि धोरणात्मक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची राज्य कार्यकारणी आपल्या सोबत असल्याचे सांगितले . तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य अधिवेशन मार्च च्या तिसऱ्या आठवडयात रत्नागिरी जिल्हयात घेणार असल्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी सांगितले
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावर बोलताना समाजभुषण संदीप कदम यांनी सांगितले की ,कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अंतर्गत शासकीय ,निमशासकीय खाजगी संस्था , नगरपंचायत ,नगरपरिद , जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक स्वरूपातील प्रशासकीय , धोरणात्मक प्रश्न गेली 40 वर्ष सोडविण्याचे बहुमोल कार्य कास्ट्राईब कर्मचारी संघटना करत आहे . कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकारी सभासद यांच्यामध्ये स्फूर्तीदायक वातावरण ,त्यांच्या जबाबदाऱ्या ,जाणिवा कर्तव्य व अधिकार याबाबतीत जागृती व्हावी यासाठी कर्मचारी महासंघाचा जिल्हा मेळावा घेत असल्याचे सांगितले . तसेच
आज जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या बाजुने लढणारी एकमेव संघटना म्हणुन कास्ट्राईब संघटनेकडे बघितले जात आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळ प्रसंगी उपोषण धरणे आंदोलन चे मार्ग स्विकारून प्रश्न सोडवले जात आहेत . अनुकंपा भरती , पदोन्नती , वरिष्ठ वेतन श्रेणी ,निवड श्रेणी , कर्मचारी निलंबित प्रश्नी कास्ट्राईब संघटना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभी रहात आहे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकी साठी कास्ट्राईब संघटना सक्रियपणे काम करत आहे . जिल्हाभरातील ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषद सफाई कामगारांच्या किमान वेतन ,भविष्य निर्वाह निधी व इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कास्ट्राईब संघटना काम करत असल्याचे संदीप कदम यांनी सांगितले काही दिवसापुर्वी कोर्ट ऑर्डर चे कारण सांगुन ठाकर समाजाचे जातीचे दाखले कणकवली प्रांत ऑफीस ने देण्याचे बंद केले होते तेथेही कास्ट्राईब संघटनेने हस्तक्षेप करून दाखले देण्यास भाग पाडले . अशा प्रकारे सर्वच आघाडयांवर कास्ट्राईब संघटना सक्रिय असल्याचे अध्यक्षपदावरून संदीप कदम यांनी सांगितले .
सदर वेळी गुणवंत कर्मचारी पुरस्कार देवुन संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले . तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मा.परशुराम गंगावणे तर राज्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव झाल्या बद्दल सन्मा. सुरेश तांबे यांचा सत्कार करण्यात आला .
सदरवेळी वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगड , सुधाकर कांबळे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष रत्नागिरी यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुर्यकांत साळुंखे यांनी केले. शेवटी संजय पेंडुरकर यांनी आभार व्यक्त केले.