Home स्टोरी कालावल खाडीपात्रा मध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खलना बाबत मर्डे ग्रामपंचायत चे...

कालावल खाडीपात्रा मध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खलना बाबत मर्डे ग्रामपंचायत चे मालवण तहसीलदाराना निवेदन….

167

 

मालवण प्रतिनिधी:

 

मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रामध्ये ग्रामपंचायत मर्डे हद्दीमध्ये खोत जुवा बेटा नजीक काही अज्ञात अनधिकृत वाळू उत्खनन करत असून या वाळू उत्खलनामुळे खोत जुवा बेटाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित अनधिकृत वाळू उत्खलन बंद करावे यासाठी मर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने मर्डे सरपंच संदीप हडकर यांनी बुधवारी दुपारी मालवण तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांना लेखी निवेदन सादर केले..

मालवण तालुक्यातील कालावल खाडीमध्ये ग्रामपंचायत मर्डे हद्दीमध्ये खोत जुवा बेट असून त्यावर ती सर्वसाधारण १४५ एवढी लोकसंख्या आहे. या बेटा नजीक हडीकडील बाजूने मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा केला जात आहे. याबाबत खोत जुवा ग्रामस्थांच्या वतीने सुमारे ३८ लोकांच्या सहीचे पत्र मर्डे ग्रामपंचायत ला सादर करून याबाबत कार्यवाही करण्यासाठी मागणी केली होती. त्या अनुषंगाने कालावल खाडीपात्रामध्ये सदरचा अनधिकृत वाळू उपसा चालू राहिल्यास बेटाला धोका पोहोचू शकतो. येथील स्थानिक माड बागायती शेतीसुद्धा धोक्यात येणार आहे.

याबाबत ग्रामस्थांनी संबंधित सर्व विभागाचे तसेच आपलेही लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते परंतु अद्याप पर्यंत यावर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही. सदर ठिकाणी परप्रांतीय कामगार यांचा मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांना त्रास होत आहे.

याकरता पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लक्ष वेधण्यासाठी सदर निवेदन सादर करण्यात आलेले आहे सदरचा अनधिकृत वाळू उपसा हा परप्रांतीयांच्या माध्यमातून होत असून कारवाई करत असताना होडीवर किवा रॅम्प वरती कारवाई केली जाते. सदरची कारवाई वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीयांवर आणि रॅम्प ला जागा देणाऱ्या जमीन मालकांवर सुद्धा करण्यात यावी. तसे न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांचा रोष पाहता येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी सदर ग्रामस्थांना उपोषणास बसण्या वाचून पर्याय राहणार नाही. यामुळे होणारी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सर्व संबंधितांची राहील. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही अशी मागणी मर्डे सरपंच संदीप हडकर यांनी मालवण तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी मर्डे उपसरपंच राजेश गावकर, युवा कार्यकर्ते बाबू खोत आणि खोत जूवा येथील महिला, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते…

 

फोटो .

मालवण तहसीलदार श्रीमती वर्षा झाल्टे यांना कालावल खडी मध्ये होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशा वरती कार्यवाही करण्यासाठी लेखी निवेदन देताना मर्डे सरपंच संदीप हडकर आणि खोतजवा ग्रामस्थ.