Home स्टोरी कारीवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा पूर्व सैनिक संघटना व...

कारीवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा पूर्व सैनिक संघटना व भैरववाडी ग्रामस्थ यांच्यावतीने सन्मान.

59

सावंतवाडी प्रतिनिधी: भारतीय सैन्य दलात ३० वर्षे अनेक आव्हानात्मक लढाईत यशस्वी योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. यासह ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यात माझा गौरव झाला. मात्र ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, त्या कारीवडे भूमीत सैनिकी परंपरा लाभलेल्या आपल्या कुटुंबीयांच्या साक्षीने कारीवडेवासियानी जो आनंददायी सत्कार केला, हा आपला सर्वात मोठा सन्मान आहे. असे प्रतिपादन कारीवडे गावाचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांनी केले.

कारिवडे ग्रामपंचायत, कारिवडे पूर्व सैनिक संघटना व भैरववाडी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत बोलत होते. यावेळी कारिवडे गावचे सरपंच सौ. आरती अशोक माळकर, उपसरपंच तुकाराम आमुणेकर, ग्रामपंचायत अधिकारी भरत बुंदे, तलाठी कु. सोनम शिरवलकर, कारिवडे पूर्व सैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा हवालदार आत्माराम साईल, निवृत्त कॅप्टन लक्ष्मण सावंत, ग्रामपंचायत सदस्य महेश गांवकर, नितिन गावडे, भिकाजी कवठणकर, सौ. तन्वी साईल, सौ. अरुणा सावंत, सौ. सेजल कारिवडेकर, सौ. प्रतिभा जाधव, सैनिक कल्याणचे अध्यक्ष, लक्ष्मण गवळी, भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत राणे, कारिवडे सोसायटी उपाध्यक्ष रविंद्र ठाकुर, पोलिस पाटील प्रदीप केळुसकर, कारिवडे सी. आर. पी. सौ. हर्षदा कारिवडेकर उपस्थित होते.

यावेळी सुभेदार मेजर संजय सावंत पुढे म्हणाले, कारीवडे गावचा सुपुत्र असल्याचा आपल्याला अभिमान आहे. भारतीय सैन्य दलातील महत्त्वाच्या सर्व यशस्वी ऑपरेशनमध्ये आपल्याला सहभागी होता आले हे मी माझे भाग्य समजतो. या पराक्रमाचे श्रेय भारत मातेला, ग्रामदैवत कालिका मातेचा आशीर्वाद, कुटुंबीय आणि कारीवडेवासियांच्या पाठबळ व प्रोत्साहनाला देतो. त्यामुळे आपली ही गौरवशाली पराक्रमी कामगिरी आपण कारिवडे गावाला समर्पित करतो. यावेळी आरती माळकर यांनी भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटनी महत्त्वाची जबाबदारी श्री सावंत त्यांच्यावर असल्याचे सांगत त्यांच्या नेतृत्वाखालील युनिटने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचे ४५ ड्रोन आणि २ क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशातच उध्वस्त करत पाडल्याचे सांगितले. तुकाराम आमुणेकर यांनी संजय सावंत यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या टीमचे कौतुक करीत शाबासकीची थाप दिली. त्यामुळे देशासाठी लढत असणारा हा भुमिपुत्र कोकणातील युवकांसाठी ‘प्रेरणा’ असल्याचे सांगितले. यावेळी आत्माराम साईल म्हणाले, जून १९९६ मध्ये सैन्य दलात भरती झालेल्या सुभेदार मेजर संजय सावंत यांनी कोणत्याही संकटाला न डगमगता १९९९ मधील कारगिल युद्धातील विजय ऑपरेशन, २००१ ते २००२ चे ऑपरेशन पराक्रम, २०१६ चे सर्जिकल स्ट्राईक व पुलावामा बालाकोट एअर स्ट्राईक, २०१९ मधील टेरर अटॅकसह आताच्या २०२५ ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभाग घेत मातृभूमीचे रक्षण करताना आपल्या युनिटच्या नेतृत्वासह कर्तबगारीचा ठसा उमठविला. तर लक्ष्मण गवळी म्हणाले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शाबासकीची थाप संजय सावंत यांना द्यायला आले असताना त्यांनी संजय सावंत यांना आप मराठा हो क्या ? असे विचारत “मराठा मरेगा, लेकीन हटेगा नहीं…!”. अशा शब्दात त्यांच्या शौर्याचे कौतुक केल्याचे सांगत संजय सावंत यांना २०२१ मधे भारतीय सैन्य दलाच्या सेनाप्रमुखांकडून शौर्य प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले होते.

यावेळी मेजर सुभेदार संजय सावंत यांचे दोन्ही ठिकाणी महिलांनी औक्षण केले तर उपस्थित आणि पुष्पवृष्टी करीत त्यांचे यादगार स्वागत केले. यावेळी तसेच कार्यक्रमात दरम्यान भारत माता की जय!, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारासह घोषणा दुमदुमून गेला. यावेळी कारिवडे पूर्व सैनिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य, भैरववाडी ग्रामस्थ, कारिवडे गावातील ग्रामस्थ, आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य सेविका तसेच बचत गटातील महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक श्री. राऊळ यांनी केले.