Home स्टोरी कारिवडे येथील श्री देवी कालिका देवस्थान समितीचे मंत्री श्री दीपक केसरकर यांना निवेदन.

कारिवडे येथील श्री देवी कालिका देवस्थान समितीचे मंत्री श्री दीपक केसरकर यांना निवेदन.

146

सावंतवाडी प्रतिनिधी: तालुक्यातील कारिवडे येथील श्री देवी कालिका देवस्थान  समितीचे शिष्ट मंडळ माननीय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांना भेटून मंदिराच्या कळस तसेच इतर भागात पावसामुळे गळती असून तो सुशोभीकरण करण्यासाठी निधी मिळावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, वर्ष १९८४ मध्ये कालिका देवी मंदिर देणगी व लोक वर्गणी आणि साहित्य गोळा करून बांधकाम पूर्ण केले. सदर देवालयाचा कळस भाग पावसाळ्यात गेल्या दोन वर्षापासून गळत आहे. पर्यायी व्यवस्था तात्पुरती केलेली आहे. परंतु गळती थांबलेली नाही .तसेच श्रीदेवी काळकाई देवी मंदिर हे देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली येत असून गाव स्तरावर स्थानिक समिती आहे.ती कार्यरत असून आजपर्यंत नियमानुसार सर्व कामकाज पहात आहे. या उपसमितीने कारिवडे गावातील कुळकांडातील खंड वसुली करण्यासाठी माननीय ऑफिसच्या देवस्थान उपसमिती सावंत खेड यांच्या सूचनेनुसार गावातील गेल्या ३३ वर्षाचा खंड कुळ आणि भरलेला नव्हता तो जवळपास उप समितीने ९०% कुळ आणि खंड भरला यासाठी देवालय सभा बोलून त्यांना खंडाविषयी माहिती पटवून दिली. व उर्वरित दहा टक्के शिल्लक राहिलेला खंड भरण्यासाठी कुळांना प्रवृत्त करणार आहोत. देवालयाच्या परिसरात स्वच्छतागृह नसल्यामुळे ५०० मीटर अंतरावर ग्रामपंचायतकडे भाविकांना जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी आपल्या मार्फत निधी उपलब्ध व्हावा तसेच माननीय अध्यक्ष देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्याकडे देवालयाच्या बाजूला स्नानगृह बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला असून त्यासाठी अंदाजे पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे हा प्रस्ताव सचिव व त्यांचे बांधकाम अभियंता यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून गेले आहेत. त्यांनी सुचवलेल्या अभियंताचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून आवश्यक ती कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर केला असून सदरचा प्रस्ताव मंजूर आहे.तरी आपल्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्याजवळ लवकरात लवकर कामासाठी निधी मिळावा अशी अपेक्षा आहे. तरी आपण याविषयी लक्ष घालून कारिवडे देवस्थान येथे होणारी मंदिराची गळती तसेच मंदिराला स्वच्छतागृह व स्नानगृह बांधून मिळण्यासाठी मदत करावी

यावेळी माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपली मागणी ग्राह्य असून कारवाई आपण मंदिराला पत्राछप्पर व स्नानगृह निधी विषयी माननीय जिल्हाधिकारी तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या जवळ पुढील आठ दिवसात संपर्क करून आपली मागणी पूर्ण करण्यासाठी मदत असे आश्वासन दिले.