Home शिक्षण कारिवडे पेडवे नंबर २ शाळेचा चा प्रकाश सबनीस याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल...

कारिवडे पेडवे नंबर २ शाळेचा चा प्रकाश सबनीस याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

139

सावंतवाडी प्रतिनिधी: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कारिवडे पेडवे नंबर २ शाळेचा विद्यार्थी प्रकाश भालचंद्र सबनीस याने २०८ गुण प्राप्त करून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.तसेच शाळेचा निकाल १००% लागला असून विद्यार्थी चांगल्या गुणांनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. त्यांना वर्गशिक्षिका श्रीम.विद्या वालावलकर मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका श्रीम.ऐश्वर्या पोकळे व शिक्षकवृंद, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ तसेच ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षांमधून मधून या शाळेचे विद्यार्थी उत्तम यश संपादन करत आहेत त्यामुळे शाळेचा नावलौकिक वाढत आहे.