Home स्टोरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्व सण शांततेत साजरे करण्याचे पोलीस प्रशासनातर्फे...

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्व सण शांततेत साजरे करण्याचे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन.

91

उरण प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे): १ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४०:३० ते ६ वा. दरम्यान तेरापंथी हाॅल उरण शहर येथे उरण आगामी दहिहंडी उत्सव, गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांचे अनुषंगाने उरण पोलीस ठाण्याचे हद्दीतील सार्वजनिक दहिहंडी, गणेशोत्सवाचे अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील, सरपंच, सागरी सुरक्षा रक्षक दल यांची बैठक घेण्यात आली.

 

सदर बैठकीमध्ये आगामी दहिहंडी, गणेशोत्सव, ईद ए मिलाद हे सण शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडण्याच्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी शासन परिपत्रकानुसार उपस्थितांना मार्गदर्शन केले व विविध सूचना दिल्या. त्या सूचना खालील प्रमाणे.

1) दहिहंडी उत्सवामध्ये सामील होणा-या गोविंदाचे वय 14 वर्षापेक्षा कमी नसावे

2) दहिहंडी उत्सव मंडळाने दहिहंडी मोकळया मैदानात लावावी.

3) दहिहंडी जास्त उंचावर बांधण्यात येऊ नये

4) गोविंदा पथकाचा विमा उतरविण्यात यावा

5) दहिहंडी उत्सवा दरम्यान कोणीही डी जे डाॅल्बी साऊंडचा वापर करणार नाहीत

6) दहिहंडीच्या ठिकाणी प्रथमोपचाराचे साहित्य तसेच ॲम्बुलन्स उपलब्ध ठेवावी

7) देशातील जातीय स्थितीचा विचार करून बाहेरून येणारे शक्तीकडून व समाजकंटकांकडून विघातक कृत्य करण्याची शक्यता असल्याने आपले स्वयंसेवक नेमावेत, देखावा पाहण्यासाठी येणारे महिला व पुरुष यांच्या वेगवेगळया रांगा कराव्यात.

8) गणपती आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलालाची उधळण न करता फुलांच्या पाकळयांचा वापर करावा

9) पावसाळया दिवस असल्याने मंडपास पत्र्याचे शेड मारून घ्यावे जेणेकरून पाऊस पडल्यास श्रीच्या मुर्तीवर पाणी पडणार नाही

10) रात्रीच्या वेळी मूर्तीचे नुकसान होऊ नये यासाठी रात्रीसाठी स्वंयसेवक नेमावे

11) गणेशोत्सवाचे मिरवणुकीत डी जे डाॅल्बी साऊंडचा वापर करणार नाहीत

12) गणेशोत्सव मंडपात सीसीटीव्ही लावणे

13) दिवसा व रात्रीसाठी स्वंयसेवक नेमणे

14) विद्युत रोषणाई करताना रोषणाई करणारा परवाना धारक आहे का याबाबत खात्री करावी ,त्यास वेळोवेळी विद्युत रोषणाई तपासून जाण्याबात सूचना द्याव्यात

15) कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना योग्य ती काळजी घ्यावी

16) एक खिडकी योजना राबविण्यात यावी यासाठी ज्या ठिकाणी सदरची योजना राबविली जात आहे ,तेथील माहिती घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.

17)रस्ता दुरुस्तीबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्या

18)एम एस ई बी च्या अधिकारी यांनी ओव्हर हेड वायर बाबत व लाईट सुरळित करणेबाबत योग्य ते नियोजन करावे

19)अग्निशामक दलाने देखील योग्य ते नियोजन करावे.

20) पोलीस मदतीसाठी डायल 112 क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा.

बैठकीमध्ये उपस्थितांच्या अडी-अडचणी समजावून घेवून त्यांचे संबंधित विभागाच्या अधिका-या मार्फत निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

 

 

सदर बैठकीस सुर्यकांत कांबळे पोलीस निरीक्षक(गुन्हे), मधुकर भटे पोलीस निरीक्षक उरण वाहतुक, झुंबर माने नगर अभियंता उरण नगरपरिषद, विजय सोनवळे कार्यकारी अभियंता एम.एस.ई.बी कार्यालय उरण, यज्ञेश म्हात्रे सहाय्यक कार्यकारी अभियंता सिडको, विजय गोसावी अग्निशमन यांच्यासह शांतता कमिटी व मोहल्ला कमिटी सदस्य, दहिहंडी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, महिला दक्षता कमिटी सदस्य, सागरी सुरक्षा रक्षक दल, पत्रकार असे १२५ ते १५० नागरिक उपस्थित होते. सदरची बैठक शांततेत पार पडली.