Home स्टोरी कामाची पोचपावती एखाद्या पुरस्काराने मीळते तेव्हा जबाबदारी वाढते…! संदिप परब

कामाची पोचपावती एखाद्या पुरस्काराने मीळते तेव्हा जबाबदारी वाढते…! संदिप परब

116

सिंधुदुर्ग: अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ ह्यांच्या नावाचा पुरस्कार जीवन आनंद संस्थेला ४ जानेवारी रोजी देण्यात आला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यानंतर जीवन आनंद संस्थेचे श्री संदिप परब म्हणाले की, अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ ह्यांच्या नावाचा पुरस्कार जीवन आनंद संस्थेला दि. ०४ जानेवारी २५ रोजी पुणे बालगंधर्व नाट्यगृहात प्रदान करण्यात आला. आता आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. ह्याची जाणीव आम्हाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय शिवकुमार डीगे सर, महाराष्ट्र पोलीस प्रमुख ( फोर्स वन) चे माननीय कृष्ण प्रकाश व अनेक संस्थांचे आश्रयदाते माननीय रवी नगरकर सर ह्यांच्या हस्ते , दुसरे पुरस्कार्थी डॉ. प्राजक्ता गिरीष कुलकर्णी माईंचे पुत्र दिपकदादा, ममता सिंधुताई सपकाळ ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत आम्हाला सन्मानीत करण्यात आले.

 

आपले सहकार्य मार्गदर्शन व प्रेम कायमचं पाठीशी राहू दे! हि प्रार्थना!

संदिप परब, जीवन आनंद संस्था