मालवण: मालवण तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घराला बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घराचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रवींद्र परब यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कातवड येथे भेट देऊन जळालेल्या घराची पाहणी केली.तसेच आमदार वैभव नाईक यांनी परब यांना आर्थिक मदत केली. यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती मंदार केणी,शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, कोळंब सरपंच सिया धुरी,उपसरपंच विजय नेमळेकर,शशांक धुरी, उमेश चव्हाण आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.