कादळवन आणि खाजण क्षेत्रांतील जैव विविधता टिकून रहाण्यासाठी होणार मदत.
म्हसळा प्रतिनिधी: जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून २२ मे २०२३ हा दिवस साजरा करण्यात येतो त्याच उद्देशाने कांदळवन सरक्षण व उपजिवीका निर्माण या केंद्र आणि राज्याचे वन विभागाचे अंर्तगत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या निमीत्ताने हा जैवविविधतेच्या संरक्षणाचे प्रचारा .साठी संयुक्त राष्ट्राने मंजुरी केलेला दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा करण्यांत आला. राज्यांतील ठाणे, रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातून जैवविविधतेवर आधारीत चित्ररथाचे माध्यमातून चित्रफीत आणि अन्य प्रसिद्धी करण्यांत आली. हा दिवस जैव विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आसल्याने शाश्वत विकास कार्यक्रमा अंर्तगत हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे म्हसळा परिक्षेत्र वनअधिकारी (वन विभाग म्हसळा) संजय पांढरकामे यानी माहीती दिली.
राज्यांत सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदळवन क्षेत्र असून, समुद्रा पासून किनाऱ्याचे सरक्षण, सायक्लॉन, फयान, निर्सग वादळ यांची तीव्रता कमी करण्याची,आपत्ती पासून धोके कमी करण्याची शक्ती कांदळवन क्षेत्र संरक्षण करण्यात आहे आणि जैवविविधतेचे महत्व कसे आहे? हे यावेळी प्रकल्प संचालक विराज दाभोळकर यानी माहीती पटाव्दारे दाखविले. यावेळी प्रकल्प संचालिका त्रिवेणी तुकाराम सेतोकर, सागर घुबे, आनंद वरशिल,आर.आर.राऊत, अतुल आहीरे, भिमराव सुर्यतळ हे वनविभागा तील कर्मचारी आधिकारी मंडळी तर किरण पालांडे. निलेश मांदाडकर मा.सरपंच खरसई , दिनेश घोले,शरद कांबळे,प्रशांत करडे आदी सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजने अर्तगत सागरी व खाडी क्षेत्रालगतच्या कांदळवन क्षेत्रातील मच्छीमार समाज व अन्य समाजाला फार मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो असे प्रकल्प संचालक विराज दाभोळकर यानी सांगून यामध्ये खेकडा पालन, बहुआयामी मस्त्यशेती, कालवे पालन, मधुमाक्षिका पालन, शिंपले पालन, गृहपर्यटन, शोभिवंत मत्स्य शेती, SRI भातशेती असे आर्थिक विकासावर आधारीत प्रकल्प राबविणे शक्य आसल्या बाबत आभ्यासू मार्गदर्शन केले.
जिल्ह्यांत फार मोठया प्रमाणांत कांदळवन आणि खाजण क्षेत्र असणाऱ्या म्हसळा तालुक्यात कांदकवाडा, रवरसई, तोंडसुरे, वारळ, या भागांत फार मोठया प्रमाणांत जन जागृती होणे आवश्यक आहे,वास्तविक जिल्ह्यांत एक स्वतंत्र वनपरिक्षेत्र अधिकारी (कांदळवनक्षेत्र)आसे नव्याने पद निर्माण करून स्वतंत्र आधिकारी आसताना सुध्दा त्यानी कांदळवन आणि खाजण क्षेत्रातील गावांतून कार्यक्रमाची पूर्वसूचना दिली नाही हे वन विभागाचे का जनतेचे दुर्दैव याचा वन विभागाने आभ्यास करणे गरजेचे आहे. निलेश मांदाडकर, मा.सरपंच खरसई आणि खाजणक्षेत्र आभ्यासक जैवविविधता- कांदळवन याबाबतचे रथ यात्रेबाबत केंद्रीय मंत्र्यांचे फोन आदेशाने हा कार्यक्रम घेतला. कोणतेही पत्र-परिपत्रक नाही. जिल्ह्यांत असणारी जैवविविधता आणि लालुका निहाय कांदळवन क्षेत्रबाबत कोणतीही माहीती कार्यालयांत उपलब्ध नाही.
समीर शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी रायगड, (कांदळवन विशेष क्षेत्र)