मसुरे प्रतिनिधी:
कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे १२ व १३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त १२ रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर चरणी लघुरुद्र, दुपारी १२ वा. महाआरती, १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत खुर्ची, रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स, मिमिक्री व नाट्यछटा, १३ रोजी रात्री ९.३० वा. डबलबारी भजन सामना दत्तगुरू भजन मंडळ, कासार्डेचे बुवा उदय पारकर, व पावणादेवी भजन मंडळ फोंडाघाटचे बुवा हेमंत तेली यांच्यात होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.