सावंतवाडी: काँग्रेसचे सोशल मिडिया अध्यक्ष केतनकुमार गावडे यांनी प्रलंबित रस्ते व अपूर्ण पुला संदर्भात घेतली उपकार्यकारी अभियंता यांची भेट. सदर भेटीदरम्यान त्यांनी खालील प्रलंबित विषयावर चर्चा केली.
१) तळवडे ते वेंगुर्ला मुख्य रस्त्याची मळगाव ते तळवडे पर्यंत डागडुजी करणे.
२) तळवडे बाजारपेठ ते खेरवाडी मार्गे नेमळे ला जोडणाऱ्या अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने चालू करणे.
३) माझ्या पेंडूर गावातील गिरोबा मंदिर येथील पुलासाठी मंजुरीला टाकलेल्या कामाबाबत चौकशी व लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी चर्चा केली.
वरील सर्व कामे जनतेच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अतिमहत्त्वाची आहेत. यात कुठलाही राजकीय हेतू नसून आपण ही सर्व कामे त्वरित व्हावी यासाठी कार्यकारी अभियंता यांच्या अनुपस्थितीत उपकार्यकरी अभियंता यांच्याशी चर्चा केली.