Home राजकारण काँग्रेस पक्ष संघटित नाही, हे मान्य करायला हरकत नाही! दिग्विजय सिंह

काँग्रेस पक्ष संघटित नाही, हे मान्य करायला हरकत नाही! दिग्विजय सिंह

62

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशातील सिहोर येथे विशेष पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलतांना दिग्विजय सिंह म्हणाले की, “काँग्रेस पक्ष संघटित नाही, हे मान्य करायला हरकत नाही. मतदानाच्या दिवशी निवडणूक व्यवस्थापनात फार मोठी कमतरता असते. ज्या प्रकारची तयारी करायला हवी, तशी तयारी करण्यात येत नाही. लोकांना काँग्रेसला मतदान करायचे, आहे. पण, आमची संघटना कमकुवत असल्याने ते करू शकत नाहीत. अशी खंतही दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली.

राज्यात पराभव झालेल्या जागांना भेटी देऊन अहवाल तयार केला जाईल. तो अहवाल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडं सोपण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीसाठी नवीन पद्धतीने रणनीती आखण्यात येणार आहे. असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं. दरम्यान, मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. २०१८ साली ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला, त्याठिकाणी दिग्विजय सिंह भेटी देत आढावा घेत आहेत. दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशातील ६६ जागांचा अहवाल तयार केला आहे.